अनुभव श्राव्य-लेखांकिका – ​अनुभूती घ्यावे असे प्रभावी अनुभव

दर वेळेस एक दर्जेदार लेख कोणा एका नामवंत लेखकाच्या लेखणीतूनच लिहिला गेला पाहिजे असे नाही. खूपदा कोणीतरी लिहिलेला स्वानुभव सुद्धा एक उत्तम साहित्य-कृती ठरू शकतो. आणि त्याचेच उदाहरण आहे Snovel ची नवी श्राव्य-लेखांकिका ‘अनुभव’. ‘अनुभव’ द्वारे आम्ही आणला आहे, तुमच्या आमच्यातल्याच काही असामान्य लोकांनी लिहिलेले त्यांचे अनुभव. ‘अनुभव’ मधील सगळे लेख वाचून, दिग्दर्शित करून त्यांना ध्वनिमुद्रित करणे तसेच त्या लेखांचा बाज तसाच ठेवणे हे अवघड कार्य करू शकलो.  प्रत्येक लेखक कोणताही लेख लिहिताना स्वतःचा आत्मा त्यात ओतत असतो, त्यांची ती आत्मीयता आणि तळमळ Snovel – श्राव्यानुभावांमध्ये कायम ठेवणे हे आम्ही आमचे परम कर्तव्य समजतो. ज्या लेखकांनी त्यांचे लेख आमच्या हाती देऊन आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्याचे खूप आभारी आहोत. ‘युनिक फीचर्स’ नीत्यांच्या ‘अनुभव’ मासिकातील निवडक आणि वेचक अनुभव ऑडीओ रुपात करण्याची तयारी दाखवली त्या बद्दल ‘युनिक फीचर्स’ च्या टीम चे (सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी, गौरी कानेटकर) पण खूप खूप आभार.

अनुभव श्राव्यालेखांविषयी थोडंसं:

 • मुक्काम सरकारी हॉस्पिटल

लेखक – दिलीप भंडारे

कोणतंही सरकारी हॉस्पिटल हे एक विलक्षण जगच म्हणायला हवं. सर्वसाधारण समाज हाच की, तिथे उपचार घ्यायला येणारा मनुष्य हा हीन-दिन दुबळा. त्यांच्या वर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्सेस त्यांचे स्वभाव , वृत्ती, सवयी. आणि थोडक्यात तुमच्या आमच्याला विलक्षण वाटणाऱ्या या जगाची सफर म्हणजेच हा लेख.

 • जंगल रात्र

लेखक – श्री. द. महाजन

निसर्गसानिध्यात रमणारे, दरी डोंगरात हिंडणारे निसर्गप्रेमी सुद्धा कशाला तरी घाबरतात का हो? जेव्हा एखाद्या जंगलात पूर्ण रात्र घालवावी लागते तेव्हा नेमकं काय वाटतं. आणि नेमकं काय झालं दाजीपूरच्या जंगलात त्या रात्री?

 • शेती पहावी करून

लेखक – श्रीनिवास पंडित

शहरी माणसांना खेड्याबद्दल शेतीबद्दल एक अनामिक आकर्षण असत. मोकळी हवा, मोकळा ढाकळा निसर्ग, संथ जीवन शैली, डोलणारी शेतं आणि शेतातलं कौलारू घर या सगळ्याच गोष्टी त्यांना आकर्षित करतात. या सगळ्यांमुळेच अनेकांना शहरातली चाकोरी सोडून खेड्यात येऊन राहावं, शेती करावी असं प्रकर्षाने जाणवू लागतं. नोकरी धंदा करून हातात ज्यादा पैसा आला कि हि इच्छा तीव्र होत जाते. पण शेती करण काय दिव्य असत ते शेती केल्यावरच कळत. शेती करण्याच्या विचाराने हुरळून गेलेल्या माणसाचा अनुभव.

 • कॅन्सर समजून घेताना

लेखक – अनिल अवचट

कॅन्सर हा सर्वव्यापी आजार आहे, तो कोणालाही होऊ शकतो. कॅन्सर झाला कि एक्झिट पक्की असं आता राहिलेलं नाही. या रोगाविषयी सहजपणे समजून घेतानाचा हा शोध.

 • अपने होने पे मुझको यकीन आ गया

लेखक – सुचेता कडेठाणकर

चीनच्याही पलीकडे आहे मंगोलिया, या देशातल्या गोबीच्या वाळवंतातून, तब्बल १६०० किमी चालून आलीये सुचेता . सलग ५२ दिवस चाललेल्या या कष्टप्रद पायपीटीने तावून सुलाखून निघालेल्या आणि या अवघड काळात स्वतःलाच जाणून घेण्याचा हा अनुभव.

 • आणखी मोठ्या रेषेसाठी

लेखक – संजय भास्कर जोशी

वयाच्या केवळ ४३ व्या वर्षी, आयडीया सारख्या कंपनीतून घेत्लेती निवृत्ती.  या जगातली आव्हानं पेलत केलेली प्रगती यांचा प्रवास म्हणजेच हा अनुभव.

 • मी डॉक्टर युद्धभूमीवरचा

लेखक – डॉ. भरत केळकर

आज जगाच्या नकाशावर अनेक ठिकाणी युद्ध-सदृश परिस्थिती आहे. निष्पाप नागरिक तिथल्या हिंसाचारात पोळून निघताहेत. अशा घटनांशी आपला संबंध येतो तो केवळ टीवी वरच्या बातम्यांमधून. एका सहज अलीप्ततेतून आपण या बातम्या ऐकतो आणि सोडूनही देतो. आपल्यासारख्याच पांढरपेशा समाजातला एक डॉक्टर मात्र, आपल्या कौशल्याचा उपयोग व्हावा या कळकळीन युद्धभूमीवर पोचतो, तेव्हा त्याला काय दिसलं याचा अनुभव.

 • आभासी या खेळाचे पाश मायावी

लेखक – मुक्ता चैतन्य

इंटरनेट गेमिंग हे नव्या पिढीच्या टाईमपासच एक मुख्य माध्यम. पण मनोरंजनासाठी एखादा कॉम्पुटर गेम खेळला आणि अर्ध्या तासांत त्यातून बाहेर पडलं आणि आपल्या कामाला लागलं असं होतं का? हे खेळ आभासी जगातून प्रत्यक्ष जीवनात कधी प्रवेश करतात आप्लाला सुद्धा कळत नाही. या आभासी दुनियेची सफर म्हणजेच हा अनुभव.

 • छोटा हत्ती

लेखक – आनंद अवधानी

सर्वसामान्यांची गरज लक्षात घेऊन, आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत ‘टाटा’ च्या टीम ने एक लो-बजेट चारचाकी वाहन ‘टाटा-एस’ जन्माला घातलं. मालवाहतुकीत क्रांतिकारी ठरलेल्या या वाहनानं सर्वसामान्य माणसाच आयुष्यही सुखकारक बनवलं. देशभर ‘छोटा हत्ती’ या नावाने ओळखल्या गेलेल्या वाहनाची कहाणी म्हणजे हा अनुभव.

 • मला उमगलेलं माझ्यापुरतं सत्य

लेखक – सदानंद दाते

सरकारी सेवेत कार्यक्षम आणि प्रामाणिक माणसांना जागा नसते असं मानलं जातं. तो समाज खोटा ठरवत. पोलीस सेवेत दीर्घकाळ आणि महत्वाच्या पदांवर काम करणाऱ्या, सदानंद दाते यांना या व्यवस्थेबद्दल उमगलेलं सत्य आणि त्यांनी त्याची केलेली समर्पक मांडणी या लेखातून प्रकट होते.

 • सोयरिक परदेशाशी

लेखक – महेश गोगटे

परदेशी जाणं आणि तिथेच स्थायीक होणं हे मराठी माणसासाठी आता नवीन नाही, तिथे गेलेली माणसं हि तिथेच आपापलं एक छोटं विश्व निर्माण करतात. त्यामुळे खऱ्या अर्थानं त्या मातीशी एकरूप होण्याचा अनुभव त्यांना येताच नाही. पण एखादा माणूस एका परदेशी मुलीशी लग्न करून जेव्हा कायमचा तिथेच रहायला लागतो, तेव्हा सारेच संदर्भ बदलतात. नवी संस्कृती आपलीशी करण्याचा अनुभव सांगतोय जपानचा एक मराठी जावई.

 

 

Leave a comment