अनाथबाबूंचं भूत संशोधन

आहे काय नक्की तिथे???

छेssssss! स्वेटर कुठे ठवला मी…. एप्रिल महिन्यात इतकी थंडी म्हण्जे जरा कमालच आहे नई…. हात गार पडलेत….. कुठे ठेवला मी स्वेटर???? शिफ्टिंग करताना कोणत्या बॅगमध्ये ठेवला कोण जाणे…. त्याचं काय आहे…. मी काही महिन्यांपुर्वी या नवीन घरात शिफ्ट झालोय. या घराला एक हिस्टरी आहे म्हणे…. त्याच त्या टिपिकल कहाण्या … कुणीतरी कुणाचा तरी खूनच केला… मग स्वतःला लटकवूनच घेतलं…. वगैरे वगैरे….या फ्लॅटची हिस्ट्री ऐकून कुणीच भाडेकरू यायला तयार होत नव्हतं.…. फ्लॅट विकला जात नव्हता…. मालक मालकीण आता म्हातारे आहेत… त्यांनीच दिलेली जाहिरात पाहिली… लगेच त्यांना भेटलो. फ्लॅट बघून घेतला …. बघता क्षणी आवडला …. ही जुनी घरं एकाच वेळी खूप सुंदर आणि भक्कम असतात. आधीचा भाडेकरू म्हणजे ज्याने खून केला आणि आणि मग स्वतःला गळफास लावून घेतला तो कुणी म्युसिक कंपोसर होता म्हणे… त्यामुळे त्या पट्ठ्याने घर साऊंड प्रूफ करून घेतलं होतं. न बाहेरचा आवाज आत येत … ना आतला आवाज बाहेर जात. त्या रात्री या घरात एवढ घडलं पण कुणाला काही ऐकू आलं नाही… बाकी फ्लॅट वेल फर्निश्ड आहे. सगळ्या सोयी आहेत. मला वाटलं भाडं सुद्धा तगडं असेल …. आपल्याला काही परवडणार नाही… पण म्हातारा म्हातारी ने आकडा सांगितला आणि मी गार पडलो. म्हणजे मुंबईसारख्या शहरात एका जुन्या भक्कम बिल्डिंग मध्ये २ बेडरूम हॉल किचनचा फ्लॅट फक्त १२००० रुपायात…. ???? शक्य आहे का सांगा …. मी लगेच डिल डन करून टाकलं. म्हटलं आता या मस्त घरात एकांतात माझं लिखाणाचं काम करता येईल.

आज हे सगळं लिहितोय कारण माझं स्क्रिप्ट आज पुर्ण झालं. थकल्यासारखं वाटतंय….. खरंतर स्क्र्प्ट पुर्ण झाल्यावर कसं हलकं हलकं वाटायला हवं…. पण बेडवर पडल्या पडल्या छ्ताकडे बघितल्यावर असं अस्वस्थ का वाटतंय…. काहीतरी आहे तिथे…. हवहवंसं…. पण भयंकर…. थंड…. काहीतरी आहे… पण काय ते नाही सांगता येत… असो… कशाला पहायचं आपण तिथे…काल सुद्धा असाच कसलातरी विचार करता करता या छताकडे पाहिलं… नंतर क्षणभरात नजर काढली तर मध्ये ७ तास उलटून गेले होते. म्हणजे मी क्षणभर नव्हे तर तब्बल सात तास छताकडे पहात बसलो होतो. कुणी पाहिलं तर म्हणेल मला नक्की भुतबाधा झाली आहे. हा हा हा हा…. अलिकडे एक वेगळाच नाद लागलाय मला ….किचनमधल्या फ्रिजवर वेगवेग्ळी मॅग्नेट्स चिकटवलेली आहेत. मी तासंतास त्यांची रचना बदलत बसतो. खूप मजा येते. काल रात्री चक्क भास झाला मला. रात्री हॉलमध्ये लिहित बसलो होतो. थकलो..झोप यायला लागली. मग लॅपटॉप बंद केला. बेडरुममध्ये जायला निघलो असता चुकुन मधल्या खोलीत लक्ष गेलं. एक तरूणी एका कोप-यात पाय पोटाशी घेऊन बसली आहे असा भास झाला.. पुढे गेलेला मी परत मागे येऊन मधल्या खोलीत पाहिलं. हा हा हा… मीच रचून ठेवलेला कपड्यांचा ढिग होता तो. एकटं राहण्याचं थ्रिल वेगळंच असतं… पण आताशा कंटाळा येतो… उदास वाटतं… एकटं वाटतं… कालपसून एक धून सतत माझ्या डोक्यात घुमत्ये…. काय माहित कुठे ऐकली…. डोक्यातच बसली आहे. थंडी वाजत्ये… स्वेटर सापडत नाहीये… बाहेर जावंसं वाटत नाहीये… विचार करायचा कशाचा तर ही धून माझ्या मेंदूचा ताबा घेऊन बसली आहे… आणि बेडवर पडावं तर ते छत …… नकोच….

म्हणून स्नॉवेल ऍप वर सत्यजित राय यांची एक गोष्ट ऐकली… अनाथबाबूंची…. ते सुद्धा त्या गोष्टीत त्या हालदार वाड्याच्या छ्ताकडे बघतात्… आणि……

आहे काय नक्की तिथे….???

https://snovel.in/product/anathbabuncha-bhoot-sanshodhan

Leave a comment