दृष्टिमित्र बडी

नेहमी सारखी सकाळी धावत पळत बस पकडली. विंडो सीट मिळाल्यामुळे जरा बरं वाटलं. सवयी प्रमाणे प्रसन्न सकाळ अनुभवत, माझ्याच विचारात खिडकीतून बाहेर बघत बसले

पुढच्याच स्टॉप वर चढलेली मुलगी माझ्या शेजारी येऊन बसली. माझ्याच नादात असल्यामुळे तिच्याकडे लक्ष गेलं नाही. जरा वेळाने मोबाईल वरचे मेसेजेस, रस्त्यांचे, बस स्टॉप चे डिटेल्स असं सगळं व्हॉईस असिस्टंट च्या आवाजात बाजूने ऐकू यायला लागलं. माझी सकाळची तंद्री मोडल्यामुळे पब्लिक प्लेस मध्ये लोक इअर प्लग्ज का वापरत नाहीतअसा विचार करत मी बाजूला एक तिरकस लुक दिला आणि त्या मुलीकडे पहिल्यांदाच नीट बघितलं. माझ्या लक्षात आलं की ती मुलगी visually challenged होती. मी तिच्याकडे बघतेय हे कसं कोण जाणे पण तिच्या लक्षात आलं. सॉरी म्हणत तिने गडबडीत इअर प्लग्ज विसरल्याचं सांगितलं. नंतर तिच्या स्टॉप वर उतरे पर्यंत तिला मोबाईल मधला व्हॉईस असिस्टंट सगळ्या सूचना देत मदत करत होता

या नवीन टेक्नॉलजीमुळे visually challenged व्यक्तींचं आयुष्य बरंच सुकर झालंय. पण ही टेक्नॉलॉजी नव्हती तेव्हा कुठल्याही व्यक्तीवर मदती  साठी अवलंबून राहता आपला आपला प्रवास करणं, रोजच्या activities करणं हे कसं शक्य होत असेल त्यांनाअसे काही विचार मनात येत होते. ऑफिस मध्ये गेल्यावर मैत्रिणीला हा अनुभव सांगितला तेव्हा तिनेदृष्टिमित्र बडी’ या अनंत भावे यांनी लिहिलेल्या कथे विषयी सांगितलं. visually challenged असलेल्या मॉरिस ला त्याचा trained 

कुत्रा, बडी कसं स्वावलंबी बनवतो ते ऐकण्यासाठी Snovel app download करायलाही तिनेच सांगितलं. उमेश कामत च्या आवाजातली वेगवेगळ्या साऊंड effects नी जिवंत झालेली ही कथा ऐकण्यासाठी मी Snovel app लगेचच download केलं. तुम्हीही करा आणि अशा छान छान ऑडिओ बुक्स चा आनंद घ्या.

Leave a comment