अंतराळातील स्फोट

उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला जायला मला खूप आवडतं. रात्री जेवणं झाली की मस्तपैकी लांबच्या लांब अंथरुणं टाकून गच्चीत सगळ्यांनी गप्पाटप्पा करत झोपणं हे माझं सुट्टीचं आकर्षण असतं. अजूनही गावाकडे एखाद दुसरा स्ट्रीट लाईट सोडला तर रात्री फारसे दिवे नसतात. त्यामुळे आकाशातले तारे अगदी स्पष्ट दिसतात. माझा दादा मला या ताऱ्यांची नावं सांगतो, ते कसे ओळखायचे ते शिकवतोरामाचा बाण, सप्तर्षी, व्याध, चमचमती शुक्राची चांदणी हे सगळं ओळखायला मला त्यानेच शिकवलं. सप्तर्षीचे शेपटीकडले तीन तारे असतात नात्यात एक अगदी छोटी अरुंधती नावाची चांदणी असते. ती जर आपल्याला स्पष्ट दिसत असेल तर चष्म्याचा नंबर आलेला नाही हे नक्की समजायचं असं दादा म्हणतो! त्यामुळे दर सुट्टीत गावी गेलं की मी ही ‘eye test’ आवर्जून करतोग्रह-ताऱ्यांविषयीच्या अशा पुष्कळ गमतीजमती दादाने मला सांगितल्या आहेत. पण अंथरुणावर पडल्या पडल्या आकाशातले तारे बघताना माझ्या मनात नेहमी विचार येतो की आज आत्ता आपल्याला जो तारा दिसतोय, त्याचा प्रकाश आपल्या पर्यंत पोहोचायला किती वर्षं लागली असतील! त्या ताऱ्या वरून निघालेला प्रकाश माझ्या डोळ्यांना दिसे पर्यंतच्या काळात त्या ताऱ्यावर किंवा त्या ग्रहावर किती उलथापालथी झाल्या असतीलकित्येक युगांपूर्वी अंतराळात एक प्रचंड स्फोट झाला होता आणि त्यामुळे आपल्या पृथ्वीवरही अशाच उलथापालथी झाल्या होत्या म्हणे! त्या उलथापालथी होण्या आधीची जीवसृष्टी फारच प्रगत होती असं दादा म्हणतो. मग तेव्हाच्या जीवसृष्टीचं पुढे काय झालं? ती सगळी नष्ट झाली की त्यातून कुणी वाचलं? त्याचे काही पुरावे असतील का? असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात आले. तेव्हा दादाने मला स्नॉवेल अँप डाऊनलोड करायला सांगितलं. तिथे डॉ. जयंत नारळीकरांचं अंतराळातील स्फोट हे पुस्तक ऑडिओ स्वरूपात आहे. त्यात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. मी तर लगेच स्नॉवेल अँप  डाऊनलोड करून ते ऐकायला सुरुवात केली सुद्धा. तुम्ही कधी करताय?

Leave a comment