अंतराळातील स्फोट

भीती आणि उत्सुक्ता या दोन्ही जुन्या भावना. या दोन्ही भावना अज्ञाताशी निगडीत आहेत. अज्ञाताची भीतीही वाटते आणि उतसुक्ता सुद्धा. भीती वाटली की मनुष्य संरक्षणाचा विचार करतो. जेव्हा नैसर्गिक घटनांची, बदलांची किंवा आपत्तींना तोंड द्यायचे कसे याचे उत्तर माणूस शोधत असताना, त्याला असे वाटले असणार की उन, वारा, पाऊस, वादळ या सर्व गोष्टी आकाशातून येतात म्हणजे या सृष्टीवर नियंत्रण ठेवणारा कुणीतरी आकाशात रहात असला पाहिजे. स्वतःचे संरक्षण करावयाचे असेल तर मग त्या कुणीतरीला खूश केले पाहिजे. पुर्वी आकाशातल्या या कुणीतरीला खूश करण्यासाठी त्याला आवाहन करून त्याचे आशिर्वाद मागण्यासाठी, माणसे हात वर करून उड्या मारत मारत, विशिष्ट आवाज करत त्या कुणीतरीचे आशिर्वाद मागत असत. सर्व समाजाच्या वतीने काही लोक हे काम करीत असत. समाजातले इतर लोक एका बाजुला किंवा या उड्या मारून आशिर्वाद मागणाऱ्या लोकांच्या भवती बसून श्रद्धेने हे सर्व पहात असत. हळूहळू ही एक प्रथाच बनत गेली. यातून अनेक विधी जन्माला आले. या विधींमध्ये तो आकाशातला कुणीतरी, ज्याला आता आपण देव किंवा परमेश्वर असं म्हणतो, तो आला आहे असे समजून, त्याला प्रसन्न करण्यासाठी ना ना प्रकारचे उपचार केले जात आणि मग हे केल्यावर त्याने सर्वाना प्रसन्न होऊन आशिर्वाद दिला आहे, असे त्याला दाखविलेला नैवेद्य, प्रसाद म्हणून खाताना मानले जात असे. या अशा अनेक घटकांमुळे पुढे धर्माची स्थापना झाली. यातून माणसला मानसिक समाधन मिळत असे. आजही मिळते असे अनेक धर्मावर श्रद्धा ठेवणाऱ्यांचे म्हणणे आहे.

इतिहासात हे सर्व घडत असताना काही लोक मात्र या आकाशातल्या कुणीतरीला खूश ठेवण्यावर समाधान मानणारे नव्हते. या अनाकलनीय सृष्टीचे नियम समजून घेण्याचा त्यांनी ध्यास घेतला. अनेक वर्षे, दशकेच काय तर अनेक शतके या ध्यास घेतलेल्या माणसांनी सृष्टीतल्या विविध घटकांचे बारकाईने निरिक्षण करून ही सृष्टी नेमकी कशी तयार झाले? हे जीव कसे तयार झल्या. हे नद्या, डोंगर, दऱ्या, समुद्र कसे तयार झाले याचे काही ठोकताळे बांधले. यातून मग खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणीत, जीवशास्त्र याचा अभ्यास करून सृष्टीच्या अस्तित्वाचं कोडं सोडवण्याचा अविरत प्रयत्न आज केली अनेक शतके सुरु आहे, आणि मानवी अस्तित्व जोपर्यंत टिकून राहिल तोपर्यंत हा शोध सुरुच राहणार आहे.

धर्मवाक्य हे ब्रम्हवाक्य मानलं जातं. ते खोडून काढता येत नाही. मात्र एखाद्याने मांडलेला वैज्ञानिक सिद्धांत एखाद्या नव्या शोधामुळे खोडून काढता येतो. ही प्रगतीची खूणगाठ मानली जाते. भारतिय इतिहासात अशा अनेक खुणा आपल्याला सापडतील. आर्यभट्ट, वराहमिहिर, भास्कर, ब्रम्हगुप्त यांचे योगदान असो, अरबस्तानातल्या आणि ग्रिस मधल्या वैज्ञाानिकांशी इथल्या वैज्ञानिकांचा असलेला मुक्त संवाद आणि ज्ञानााची देवाणघेवाण असो.

नुकतेच काही दिवसांपुर्वी एका महाप्रचंड दुर्बिणीच्या सहाय्याने, पृथ्वीपासून सुमारे ५ कोटी प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका कृष्णविवराचे छायाचित्राचे अनावरण झाले. “या शोधांचा आपल्याला काय उपयोग, याने थोडीच माझं पोट भरणारे भाऊ? असलं तर असलं कृष्णविवर … काय फरक पडतो?” असे प्रश्न विचारणारे खूप भेटले. ज्येष्ठ भारतिय ख्गोलशास्त्रज्ञ, डॉ. जयंत नारळीकर यांची अंतराळातिल स्फोट ही कादंबरी वरील पडलेल्या प्रश्नांसाठी आणि हे प्रश्न पडलेल्या व्यक्तीसाठी दिशादर्शक ठरावी.

Leave a comment