टेराडॅक्टाईलचे अंडे

काळ नेहमी एकाच रेषेत आणि एकाच दिशेने प्रवासका करतो? आपण नेहमीच वर्तमानकाळातून भविष्याकडे प्रवास करतो. असे का? एखाद्या टेबलावर ठेवलेला कप धक्क लागून खाली पडला आणि फुटला… असंअ आपल्याला नेहमीच दिसतं. पण एखादा फुटलेला कपाचे तुकडे एकमेकांना आपोआप जुळून पुन्हा त्याचा कप तयार होऊन तो टेबलावर स्थिरावला असंअ कधीच आपल्याला पहायला मिळत नाही. एका बिंदूपासून एक महास्फोट झाला आणि त्या स्फोटातूनाअजचं विश्व निर्माण झालं. आजही अवकाशात पहिलं तर अवकाशातले सर्व घटक एकमेकांपासून लांब जाताना आपल्तयाला दिसतात. काळ नेहमी पुढे जातो. मागे फिरत नाही. आपण मात्र आपल्या मनात घडून गेलेल्या गोष्टींबद्दल आणि अज्ञात भविष्यकाळाबद्दल नेहमी विचार करत बसतो. जर कोणत्याही क्षणी पटकन इसवी सन ६०० मध्ये जाऊन परत येता आलं असतं तर … किंवा २१०० साली पृथ्वीवर ग्लोबल वॉर्मिंग मुळे नेमकी काय परिस्थिती असेल हे बघून येता आलं असतं तर….? कथाकारंनी अनेकदा या काल्पनिक टाईममशीनचा उपयोग आपल्या कथेतल्या पात्रांना काळातून प्रवास करता यावा म्हणून केला.

खरं टाईममशीन हे कल्पनेत तर असतं… भविष्यात येणार असलेल्या एखाद्या दुष्काळाची किंवा वादळाची सुचना देणाऱ्या वैज्ञानिकांच्या गणीतात असतं किंवा मग भुतकाळात घेऊन जाणाऱ्या एखाद्या आठवणीत असतं. भूतकाळात काढलेला फोटो, शूट केलेला विडिओ यामध्ये असतं. पाऊस पडल्यानंतर मातीचा येणार वास शाळेची आठवण करून देतो. आता वय झालेल्या बाबांचा रात्री दमून झोपलेला चेहेरा दिसला की लहानपणी त्यांनी सांगितलेली गोष्ट ऐकतानाची डोळ्यावर आलेली झोप आठवते.

स्नॉवेल ऍप वर मी सत्यजित राय यांची टेराडॅक्टाईलच्या अंड्याची गोष्ट ऐकली. काही नाही … खूप सोपं आहे. डावी कळ दाबली की भूतकाळ आणि उजवी कळ दाबली की भविष्यकाळ!

Leave a comment