स्नॉवेल पॉडकास्ट

मराठी माणसाला व्यक्त व्हायला अगदीच आवडतं, मग ते लिखाणातून असो किंवा गप्पा मारण्यातून! हे व्यक्त होणं कधी वेगवेगळ्या विषयांवरचं असू शकतं किंवा कधी एखाद्या सूत्राभोवती गुंफलेलंही असू शकतं! मराठी माणसाला त्याचे अनुभव, किस्से शेयर करायला देखील खूप आवडतं.

असेच काही अनुभव, किस्से, माहिती, लेख, साहित्य, गोष्टी, गप्पा, मालिका ऐकण्याची संधी आता स्नॉवेल पॉडकास्टच्या रुपाने मिळणार आहे. पॉडकास्ट हा प्रकार मराठीत अजून तितका रुळलेला नाही, त्यामुळे पॉडकास्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न कदाचित तुमच्या मनात आला असेल. Podcast/पॉडकास्ट म्हणजे तुम्हाला हवं तेव्हा (any time किंवा on demand), हवं तिथे (any where – म्हणजे मोबाईल फोनवर, टॅबलेटवर, डेस्कटॉपवर) ऐकता येतील असे ऑडिओ कार्यक्रम.

स्नॉवेल पॉडकास्ट म्हणजे एखादी स्वतंत्र ऑडिओ कथा / लेख / अनुभव किंवा एखाद्या सूत्राभोवती गुंफलेली एक ऑडिओ सिरीज (मालिका) असू शकते.

वेगवेगळे लेखक, इंटरेस्टिंग विषय आणि कसलेल्या कलाकारांच्या आवाजातलं सहज, साधं आणि सोपं सादरीकरण ही स्नॉवेल पॉडकास्टची काही वैशिष्टयं. (शिवाय हे सगळं अगदी मोफत! तुमच्याकडे इंटरनेट असलं की झालं!)

तर मग या नव्या, रोमांचक श्राव्यानुभूतीसाठी तयार रहा!

स्नॉवेल पॉडकास्ट……! CLICK HERE FOR ANDROID APP